झोपडीतून चक्क बाजरीच्या पोत्याची चोरी,आरोपीस अटक

1 0
Read Time1 Minute, 53 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

पिंपळगाव ता.दौंड- दि 19 सप्टेंबर 2021 रविवार रोजी पिंपळगाव गावचे हद्दीत बंद झोपडीचा पडदा बाजूला करून झोपडी तील एक बाजरीचे पोते डोक्यावर घेऊन चोरी करून निघाला असताना त्यास यवत पोलीस स्टेशन कर्मचारी व तेथील लोकांनी ताब्यात घेऊन यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ८२९/२०२१ भा. द.वि.३८० प्रमाणे दाखल करत गुन्हा उघडकीस आणलेला असून आरोपी नामे लाल्या उर्फ शरद दुर्योधन काळे वय २१ वर्षे रा.आलेगाव पागा ता.शिरूर जि.पुणे यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे, कसून चौकशी सुरू असून आरोपी कडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आता सदर आरोपीकडून घरफोडी व चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून त्याचे कडून १,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते सो., उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस सो. यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार,
पो. हवा संदीप कदम,पो हवा निलेश कदम,पो.हवा. गुरू गायकवाड,पो.शि. सोमनाथ सुपेकर,पो. शि. मारुती बाराते
यांनी केलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.