
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनी अंधश्रध्दा निर्मुलन समिती तर्फे अभिवादन सभा
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिना निमित्ताने अंधश्रध्दा निर्मुलन समिती चाळीसगांव यांच्या वतीने महात्मा फुले लाईफ ॲण्ड मिशन सेंटर , महात्मा फुले नगर येथे अभिवादन सभे चे आयोजन करण्यात आले होते
या अभिवादन सभेत चाळीसगांव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका चे सामूहिक वाचन करून अभिवादन सभेचे उद्घाटन करण्यात आले. मा. निताताई सामंत यांनी अंधश्रध्दा निर्मुलन समिती स्थापना व इतिहास यावर मार्गदर्शन केले तसेच मा.सागर नागने यांनी जादूटोणा विरोधी कायदा आणि त्याचा लढा व प्रवास समजावून सांगितला तर मा.दिलीप चव्हाण यांनी अंनिस प्रेरणा उद्देश आणि माझा सहभाग यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन कलप्तेश देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक नितीन परदेशी यांनी केले सदर अभिवादन सभेत अभिवादन गित सादर करण्यात आले त्यात मोनाली कांबळे, जयश्री गायकवाड, शितल पाटील, संघमित्रा त्रिभुवन, कविता सावले, रत्ना शेजवळ, सपना अहिरे, उज्वला कांबळे हे सहभागी होते तसेच सुनील गायकवाड व आशितोष अहिरे यांनी साथ संगीत केले. तसेच या अभिवादन सभेस प्रा. विजया चव्हाण, वैशाली निकम, प्रतिभा पाटील, मंदा कांबळे, प्रा. गौतम निकम, गणेश भोई, सतीश पाटील, निलेश परदेशी, शंकर पगारे, प्रा.किरण पाटील,सचिन आगोने यांच्या सह परिसरातीलअनेक महिला उपस्थित होत्या.
Related
More Stories
राज्य परिवहन चाळीसगाव आगारात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 21 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त राज्य परिवहन चाळीसगाव आगारात इफ्तार पार्टीचे...
संविधान घराघरात पोहचविण्यासाठी संविधान जागर अभियानाचे आयोजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने...
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 22 युट्युब वृत्तवाहिन्या,3 ट्विटर खाते,1 फेसबुक खाते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले ब्लॉक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दिल्ली(वृत्तसेवा)-माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022...
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यास सभासदांचा विरोध….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीच्या दि.6 फेब्रुवारी 2022 च्या बैठकीत केवळ सर्वसाधारण...
घराणेशाहीचा पराभव जनतेचा विजय-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क https://twitter.com/narendramodi/status/1501960490402127874?t=keQ46I9RKA_jQ8k8qYC_Lw&s=19 दिल्ली(वृत्तसेवा)-दि 10 मार्च रोजी दिल्ली भाजपाच्या मुख्य कार्यालयावर भाजपातर्फे आभार व अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात...
आमचा दिवस कोणता?………… पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे
अधिकार आमचा दिनविशेष लेख पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे महिला दिन भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व...
Average Rating