Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

तहसील कार्यालयात विद्यार्थी व पालकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबाबवी-महिला काँग्रेस कमिटी चाळीसगांव

0
0 0
Read Time3 Minute, 25 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)- शहरातील तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेमधील प्रशासकिय कर्मचारी संजय पाटील नागरिकांना आर्थीक पिळवणुक व मानसिक त्रास देण्याचे काम करत आहे.
चाळीसगांव शहर व ग्रामीण भागातील विदयार्थी व विदयार्थीनी महिला व पालक तसेच इतर नागरीक तहसील कार्यालयात शाळेसंबंधी लागणारी कागदपत्रे उत्पन्नाच्या दाखल्यापासुन ते जातीच्या दाखल्यापर्यंत काढण्याच्या कामासाठी येत असतात. त्यावेळी त्यांना तहसील कार्यालयाचा साक्षांकित सही व शिक्याची गरज भासत असते संजयगांधी निराधार योजनेचे प्रशासकिय कर्मचारी संजय पाटील हे विदयार्थी व विदयार्थीनी, महिला व पालक यांच्या बरोबर उडवा उडवीची उत्तरे देतात,तसेच असभ्य वर्तन करतात यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना आर्थिक पिळवणूक व मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यासंदर्भात चाळीसगांव तहसीलदार अमोल मोरे यांना चाळीसगांव शहर काँग्रेस महिला कमेटीचे अध्यक्ष सौ.अर्चनाताई पोळ व युवा काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मधु गवळी यांनी निवेदन दिले.महिला काँगेस कमिटी च्या अध्यक्षा अर्चना ताई पोळ यांनी तहसीलदारांना निवेदन देतांनी सांगितले की विद्यार्थी व पालकांना होणारी गैरसोय थांबवावी,यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना करणार असून असली गैरसोय होणार नाही असे आश्वासन दिले
यावेळी महिला काँग्रेसचे व काँग्रेस चे कार्यकर्ते छाया खरटमल, कुसूम खरटमल, संगिता खरटमल,निती खरटमल, रंजना खरटमल, केशरवाई साबणे, सुमनबाई मोची, सुमन नगवारे चाळीसगांव युवक विधानसभा अध्यक्ष मधु गवळी, राहुल मोरे (मा.प्र.काँ.अ.जा.सरचिटणीस),रविंद्र पोळ (मा.युवक अध्यक्ष), रमेश शिंपी(जि.उपअध्यक्ष), अमोल राहुल (युवक जिल्हा सरचिटणीस), भुषण पाटील(युवक तालुका अध्यक्ष), ज्ञानेश्वर वाघ (युवक तालुका सरचिटणीस), निलेश भडक (युवक तालुका कार्यअध्यक्ष) तसेच शिवलाल सावणे, बापु चौधरी, पवन जाधव, आनंद गांगुर्डे, गफार शेख, अनिस शेख,शिवाजीआप्पा राजपुत,नितीन मोरे,अजय पोलोडिया, देविदास खरटमल, माजी आमदार ईश्वरभाई जाधव,पवार, आर.डी.चौधरी इ. पदाधिकारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: