अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी पवन साळवे
काल दिनांक ०६ जून २०२० रोजी दौंड – पुणे – दौंड प्रवासी संघाच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत अत्यावश्यक सेवा साठी दौंड – पुणे रेल्वे प्रवास लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न लवकरच प्रत्यक्षात येतील.
सोलापूर विभागाचे महाव्यवस्थापक तसेच पुण्याचे महाव्यवस्थापक आणि पुणे जिल्हाधिकारी यांचे बरोबर समन्वय घडवून आणला तो दौंड चे आमदार मा. राहुल दादा कुल यांनी या सर्वांना परिस्थितीची सर्व माहिती दौंड पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष मा. प्रेमसुखजी कटारिया. यांनी दिली. सदर रेल्वे प्रवास हा फक्त आणि फक्त अत्यावश्यक सेवेत जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच असणार आहेत, त्यासाठी खालील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
१. अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यास दररोज आपले आय कार्ड दाखवून चालू तिकीट (current) खरेदी करावे लागेल. (मासिक पास चालणार नाही)
२. अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याने तंदुरुस्तीचे प्रमाण पत्र (फिटनेस सर्टिफिकेट) बाळगणे बंधनकारक आहे.
३. सर्व नियमांचे पालन करत रेल्वे प्रवास करावा.
४. दौंड वरून पुण्याला जाताना व पुण्यातून दौंड ला येताना sanitizer स्वतःला करून मगच प्रवास करावा,व कायम मास्क, ग्लोज वापरावे आणि शासनाचे नियम कायम पाळणे गरजेचे आहे.
५. रेल्वे डब्यातून प्रवास करत असताना social distence पाळणे अत्यावश्यक आहे.
६. आपण अत्यावश्यक सेवेत असल्याचा पुरावा प्रवासात बाळगणे बंधनकारक आहे.
७. संपूर्ण प्रवासात आपण जागरूकतेने प्रवास करावा.
८. आपण सदिव लक्षात ठेवावे की आपण स्वतः सुरक्षित राहिलो तर आपला परिवार सुरक्षित राहील आणि त्याबरोबरच आपल्या आसपास चे सर्व सुरक्षित राहतील आणि असे झाल्यास आपला गाव देखील सुरक्षित राहील.
वरील सकारात्मक निर्णय प्रत्यक्षात लवकरच येईल, तसेच खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसाठी देखील प्रयत्न सुरू आहेत येत्या काही दिवसात तो देखील निर्णय अपेक्षित आहे, त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे.
दौंड – पुणे – दौंड प्रवासी संघ