दौंड पोलिसांची सिने स्टाइल कामगिरी नगर जिल्ह्यातून चोरून आणलेली बोलेरो गाडी सिनेस्टाईल पाठलाग करून घेतली ताब्यात….

6 0
Read Time2 Minute, 0 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-आज दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास पोलीस नेहमीप्रमाणे गस्त करीत असताना दौंड शुगर कारखाना जवळ एक क्रमांक MH 42 H 6002 या गाडी मध्ये तीन ईसम संशयित रीत्या फिरताना दिसल्याने पोलीस पथकाने त्यांना दौंड शुगर पेट्रोल पंपावर हटकले असता त्यांनी गाडी जोरात लिंगाळी रोडणे पळवली दौंड पोलिसांनी मोटरसायकलवर त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी गाडी खोरवडी गावच्या हद्दीत कच्च्या रस्त्याने उसाच्या शेतात गाडी घातली व अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांचा पहाटे सर्वत्र शोध घेतला ,परंतु संशयित मिळून आले नाहीत तरी ती बोलेरो गाडी ही कर्जत तालुक्यातील राशीन या गावातील चोरी करून आणल्याचे नंतर तपासा वरून निष्पन्न झाले असून कर्जत पोलिस स्टेशन येथे दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी पहाटे चोरीचा गुन्हा दाखल केेला आहे, अवघ्या चार तासात गाडी परत मिळाल्याने गाडी मालकाने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात ,आसिफ शेख ,पोलीस नाईक धनंजय दाभाडे ,किरण राऊत ,पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी ,अमोल देवकाते ,रवी काळे व तीन होमगार्ड यांचे आभार मानले.

Happy
Happy
91 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
9 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.