दौंड(पवन साळवे):-आज दि 7 एप्रिल रोजी दौंड पोलीस ठाणे तर्फे ज्या इसमावर पूर्वी गुन्हा दाखल आहे व त्याने परत गुन्हा केल्यास तात्काळ तडीपार कारवाई करण्यात येते. दौंड पोलीस ठाणे रेकॉर्डवरील जालिंदर विष्णू धोत्रे वय 27 वर्षे राहणार वडार गल्ली दौंड याच्यावर दंगल करणे दुखापत करणे संघटितपणे वाळू चोरी करणे महिलांचे विनयभंग करणे गर्दी मारामारी करणे या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा तो आपले गुन्हेगारी कर्तुत्व सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्याचा तडीपारीचा प्रस्ताव माननीय उपविभागीय अधिकारी श्री गायकवाड पुरंदर यांच्याकडे सादर करण्यात आला होता .त्यांनी सदर इसमास पुणे ग्रामीण जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आलेली आहे .सदर इसमाने परवा कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आजचा बंदोबस्त चालू असताना व शहरांमध्ये संचारबंदी लागू असताना गोवा गल्लीतील मुले वडार गल्ली काही मुले घेऊन गर्दी मारामारी केली आहे दंगल केलेली आहे त्यामुळे सदर भागात परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत सदर इसम शुल्लक कारणावरून दौंडच्या काही भागात तणाव निर्माण करत असतो संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर तात्काळ तडीपारीचा आदेश बजावण्यात आला सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ए एस आय भाकरे पोलीस नाईक बोराडे पोलीस हवालदार आसिफ शेख पोलीस शिपाई वाघ यांनी केली आहे
Read Time2 Minute, 18 Second