दौंड मध्ये आंबेडकर जयंत्ती निमित्त अनिकेतभाऊ मिसाळ युवा मंच व सुवर्णयुग मित्र मंडळ तर्फे एक हात मदतीचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

1 0
Read Time3 Minute, 30 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी हर्षल पाटोळे

दौंड(प्रतिनिधी)-क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निम्मित पीक अँड ड्रॉप बॉक्स चे नीयोजन दी.14 एप्रिल 2021 रोजी करण्यात आले होते. ज्या गरजू लोकांना खरंच अंग वस्त्र, पुस्तके व पादत्राणे यांची गरज आहे ते नक्कीच त्यांच्या पर्यंत पीक अँड ड्रॉप बॉक्स च्या माध्यमातून पोहचेल ज्यांना गरज आहे त्यांनी त्या बॉक्स मधून गरजेची वस्तू घेऊन जावी आणि ज्यांच्या कडे अतिरिक्त कपडे, पुस्तके, चप्पल -बूट आहे त्यांनी त्या बॉक्स मध्ये ठेऊन जावे जेणेकरून ती ती योग्य वस्तू त्या त्या गरजू व्यक्ती पर्यंत पोहचेल. शासनाने जरी आपल्याला कोरोना मुळे प्रतिबंध लावले असतील तरी आपण आपल्या महापुरुषांची जयंती थाटात कशी साजरी करू शकतो हे आपण आज दाखवून दिले आहे.आम्ही आज आमच्या महापुरुषांची जयंती वाजत गाजत न करता त्यांच्या विचारांची जयंती साजरी करत समस्त जगाला हे दाखवून दिले आहे कि महापुरुषांच्या विचारांची धार इतकी आहे कि कुठल्याही परिस्थतीला ती कापू शकते. पीक अँड ड्रॉप बॉक्स चे आयोजन बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वामी समर्थ मंदिर व मीरा हौसिंग सोसायटी अशा विविध ठिकाणी करण्यात आले आहे.

बाबासाहबे आंबेडकर चौक येथील उदघाटन गेली 4-5 दिवसांन पासून सतत आपले कार्य एकनिष्ठतेने बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बंदोबस्त करणारे आणि लोकांची रक्षा करणारे दौंड SRPF ग्रुप 5 च्या जवानांच्या हस्ते करण्यात आले तर स्वामी समर्थ मंदिर व मीरा हौसिंग सोसायटी तील पीक अँड ड्रॉप बॉक्स चे उदघाटन तेथील जेष्ठ समाज सेवक साळवे साहेब,गायकवाड साहेब, निखिल रणदिवे, वाबळे काका व महिला समाज सेविका तारू मॅडम, कांबळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे मार्गदर्शन अनिकेतभाऊ मिसाळ, हिरालाल साळवे यांनी केले व दौंड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शाहू पाटील सर सोबत प्रतीक वाघमारे, विकी सरवदे, आकाश झोजे, अभिषेक जाधव, विजय घेंगाठ,तुषार साळवे, महेश गायकवाड, ओंकार जगताप,अक्षय शिखरे, अक्षय मिसाळ,योगेश साळवे, सूर्यकांत धुमाळ, मोहन ओहळ,ऋषिकेश दिघे,सुरज गावडे,यांच्या सोबत अन्य मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.