दौंड(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध संघटनांतर्फे करण्यात आले होते ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाले होते अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात दौंड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना शहरातील हुतात्मा चौक येथे जनकल्याण शहर स्तर संघ यांच्यातर्फे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे गायन करण्यात आले. यावेळी जनकल्याण शहर स्तर संघाच्या अध्यक्षा ज्योती मोकळ, उल्का कांबळे,कौसर सय्यद,सुरैय्या शेख, उज्ज्वला साळवी, पूजा पवार,अंजली कांबळे, दिपाली माने, दौंड नगरपरिषदेचे अधिकारी हनुमंत गुंड, दीपक म्हस्के, शुभम चौकटे इत्यादी उपस्थित होते.