
नारदाच्या गादीचा अपमान पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची राष्ट्रीय जन मंच (सेक्युलर) पक्षाची मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-२७.४.२०२२ रोजी हनुमानसिंग नगर परिसरात कीर्तनाचा कार्यक्रम सुरु असतांना शहर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी बूट घालून स्टेजवर चढत, त्यांनी पवित्र अशा नारदाच्या गादी वर पाय ठेवत, माईक हातात घेऊन कीर्तनकार महाराज व पत्रवादकाला चिथावणीखोर पद्धतीने धमकावले अश्या पद्धतीने नारदाच्या गादीचा अपमान केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व जनता संतप्त झाली आहे. जनतेच्या मनात अशा पोलीस अधिकारी विरोधात चीड निर्माण झाली आहे. असे कृत्य पोलीस अधिकार्याला न शोभणारे आहे. आम्ही यांचा पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो.
माफी मागायची होती तर जेथे नारदाच्या गादीचा अपमान केला तेथे जाऊन किर्तनकारांची माफी मागायला हवी होती,आमदार कार्यालयात बसून नको आणि किर्तनकारांना दम न देता आयोजकांना समजावता आले असते-इंजि संदीप लांडगे राष्ट्रीय जनमंच राष्ट्रीय सचिव
तरी काल दि 28 एप्रिल रोजी आमदार मंगेश चव्हाण यांच्या ऑफिस मध्ये माफी मागण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. तो कुठल्याही पद्धतीने मान्य करण्यासारखा नाही. या प्रकरणी जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत.
लग्न समारंभात रात्री ११-१२ वाजेपर्यंत डीजे सुरु असतात अशा वेळेस कुठे गेली यांची कर्तव्य दक्षता डीजे सुरु असतांना अर्थीक हितासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे व हिंदू समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांवर खाकी वर्दी घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न करायचा हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.स्वतःला हिंदूवादी समजणार्या पक्षाचे आमदार या प्रकारनात हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला पाठिशी घालतात. हे अत्यंत विरोधाभासी आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ७ दिवसाच्या आत
चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक के के पाटील यांना निलंबित करावे. अन्यथा राष्ट्रीय जन मंच (सेक्युलर ) पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी. असे निवेदन पोलीस उपअधीक्षक कार्यालयात राष्ट्रीय जन मंच पक्षच्या वतीने देण्यात आले निवेदनावर राज्य सचिव संदीप लांडगे, शहर अधयक्ष निलेश गायकवाड, शहर उपाध्यक्ष सचिन शेटे पाटील, युवक आघाडी अध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका संघटक मनोज माळी यांच्या सह्या आहेत.
Average Rating