अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
आज दिनांक 21 मे 2020 कोरोणा च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊच्या काळात परप्रांतीय मोल मजुरांना आपल्या गावी सोडवण्यासाठी बारामती मतदारसंघाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे दौंड जंक्शन वरून(युपी)उत्तर प्रदेश मध्ये जाण्यास गाडी उपलब्ध करवून दिली.जवळपास दौंड तालुक्यातील अडकलेले 1101 प्रवासी उत्तर प्रदेश साठी रवाना झाले तसेच दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते दौंड जंक्शन वरती प्रवाशांना सोडवण्यासाठी आले असता यावेळी दौंड तहसीलदार संजय पाटील.मुख्याधिकारी मंगेश शिंदे ,बी डी ओ.गणेश मोरे,सचिन आखाडे(नायब तहसिलदार),श्री:कलगुटगे(प्रभारी अधिकारी रेल्वे पोलीस),डॉ.अशोक राजगे(तालुका आरोग्य अधिकारी),दौंड शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,तलाठी वर्ग(मंडल अधिकारी-सुनील जाधव, फरांदे, बाळाजी जाधव,संतोष इदोळे,मनोज तेलंग,शशिकांत सोनवणे),वैशालीताई नागवडे(महिला जिल्हाध्यक्ष),सोहेल खान(जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग),मोहन नारंग(नगरसेवक),आप्पासाहेब पवार(राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष),दीपक सोनवणे(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष), सचिन गायकवाड(युवक शहराध्यक्ष)यांच्या उपस्थितीत ट्रेन रवाना केली.दुपारी 1 वाजता हिरवा झेंडा दाखवून मेल एक्सप्रेस ड्रायव्हर डीएम रणभाते असिस्टंट ड्रायव्हर दीपक कुमार युपी साठी गाडी घेऊन रवाना झाले.