अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी )- गुजरात राज्यातील अट्टल गुन्हेगाराला जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी निझर पोलीस स्टेशन, सुरत (गुजरात) यांच्याकडून माहिती मिळाली की, तापी व्यारा सेशन कोर्ट केस नंबर-४२/२०२४ (दि.३०/०९/२०२५) भादंवि कलम ३९४, ३९७, ३४२, ३२३, ५०४(२), ३४, १२०(ब), आर्म्स अॅक्ट २५(१), जी.पी. अॅक्ट १३५ अन्वये जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी साहील उर्फ सलीम पठान (वय २१, रा. भाटीया गाव, हाजीपुरा, सचिन, जि. सुरत, गुजरात) हा जळगाव जिल्ह्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पथकाने सापळा रचून भुसावळ शहरातील नहाटा चौफुलीजवळील हायवेवरून काल १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात जबरी चोरी, घरफोडी, चोरी तसेच आर्म्स अॅक्ट अंतर्गत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत –
१) उमरा पो.स्टे (गु.) – गु.क्र. ९३/२२ – भादंवि कलम ४५७, ३८०
२) उमरा पो.स्टे (गु.) – गु.क्र. ७०२/२२ – भादंवि कलम ४५७, ३८०
३) उमरा पो.स्टे (गु.) – गु.क्र. ७०३/२२ – भादंवि कलम ४५७, ३८०
४) सचिन पो.स्टे (गु.) – गु.क्र. ९३३/२२ – भादंवि कलम ४५७, ३८०
५) माहीरापुरा पो.स्टे (गु.) – गु.क्र. ७०५/२२ – भादंवि कलम ४५७, ४५४, ३८०
६) पुना पो.स्टे (गु.) – गु.क्र. १४९/२२ – भादंवि कलम ४५७, ११४, ३८०
७) कडोदरा पो.स्टे (गु.) – गु.क्र. ९१८/२२ – भादंवि कलम ३७९
८) नवसारी ग्रामीण पो.स्टे (गु.) – गु.क्र. २८५/२२ – भादंवि कलम ३७९
अशा प्रकारच्या एकापेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये तो सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक केलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी निझर पोलीस स्टेशन, सुरत (गुजरात) यांचे सफौ/ ए. बी. पटेल यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउपनिरिक्षक शरद बागल, श्रे. पोउनि. रवि नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकॉ प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांचा समावेश होता.
