दौंड(प्रतिनिधी):-दिनांक 07/03/2020 रोजी पाटस ते दौंड दरम्यान विशेष मेगाब्लॉक असल्याकारणाने मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील काही एक्सप्रेस/ पॅसेंजर/ डेमु लोकल रद्द/ अंशतः रद्द करण्यात आलेले आहेत.
1)71403 पुणे दौंड डेमु लोकल पुणे रेल्वे स्टेशन टाईम सकाळी 9:40 ला रद्द.
2)71409 पुणे दौंड डेमु लोकल पुणे रेल्वे स्टेशन टाईम दुपारी 2:45 ला रद्द.
3)71410 दौंड पुणे डेमू लोकल दौंड रेल्वे स्टेशन टाईम संध्याकाळी 5:10 ला रद्द.
4)71406 बारामती दौंड पुणे डेमू लोकल बारामती रेल्वे स्टेशन टाईम दुपारी 4:20 ला रद्द.
5)51452 बारामती दौंड पुणे पॅसेंजर बारामती रेल्वे स्टेशन टाईम सकाळी 10:40 ला ही गाडी बारामती ते दौंड दरम्यान धावेल सदर या गाडीचा टाईम दौंड रेल्वे स्टेशन टाईम दुपारी 12:10 ला दौंड ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
6)12169/12170 पुणे सोलापूर पुणे इंद्रायणी एक्सप्रेस रद्द.
7)17013/17014 पुणे हैदराबाद पुणे एक्सप्रेस ही गाडी पुणे दौंड पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
पाटस ते दौंड दरम्यान कॉड लाईनच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला असून सदर हा मेगाब्लॉक सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत असून पुणे दौंड पुणे दरम्यान धावणाऱ्या गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे.
Read Time2 Minute, 3 Second