बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या २ महिन्यांच्या पगारबाकी तहसील आवारात ठिय्या आंदोलन,८ दिवसात पगार करण्याचे लेखी आश्वासन,रयत सेनेच्या आंदोलनास यश

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- चाळीसगाव महावितरण कंपनी च्या अर्बन १ व अर्बन २ ,३ आणि R 2 सबडिव्हिजन येथे काम करण्यासाठी दिलीप कॉन्ट्रॅक्टर नासिक एजन्सी मार्फत तालुक्यातील बाह्य स्त्रोत कर्मचारी भरती करण्यात आले आहे .कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला पगार देणे बंधनकारक असताना दिलीप कॉन्ट्रॅक्टर नासिक एजन्सी यांना चाळीसगाव महावितरण कंपनीने सदर एजन्सीचे बिल पुढील कार्यवाहीस जळगाव सर्कल कार्यालयात पाठविण्यास हेतुपुरस्सर विलब केल्याने ऑक्टोबर २०२२ चा व जुन २०२३ चा कर्मचाऱ्यांना जवळपास ८ महिने पगार न दिल्यामुळे रयत सेनेने कार्यकारी अभियंता व दिलीप कॉन्ट्रॅक्टर नासिक एजन्सी यांना ४ दिवसात पगार देण्याची मागणी निवेदनद्वारे केली होती. मात्र पगार न मिळाल्यास दि २० रोजी पुन्हा आंदोलनाचा ईशारा दिला होता तरीही पगार न झाल्याने रयत सेना व बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्यांनी दि २० जुलै२०२३ रोजी चाळीसगाव तहसील आवारात तब्बल ५ तास ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांचे ८ दिवसात पगार करण्याचे चाळीसगाव कार्यकारी अभियंता व दिलीप कॉन्ट्रॅक्टर नासिक एजन्सी तर्फे लेखी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. रयत सेनेने केलेल्या आंदोलनामुळे कामगारांना न्याय मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी रयत सेनेचे धन्यवाद व्यक्त केले.
चाळीसगाव महावितरण कंपनीच्या कामासाठी दिलीप कॉन्ट्रॅक्टर नासिक एजन्सी मार्फत चाळीसगाव तालुक्यातील १०४ बाह्य स्त्रोत कर्मचारी कामावर घेतले आहे. बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर २०२२ चा पगार गेल्या आठ महिन्यांपासून न मिळाल्याने बाह्य स्त्रोत कर्मचारी दिलीप कॉन्ट्रॅक्टर नासिक एजन्सी व महावितरण कंपनीच्या अभियंता यांना कर्मचारी हे वेळोवेळी भेटुन व तसेच पगाराची मागणी करून देखील पगार न मिळाल्याने रयत सेनेच्या वतीने दि १७ जुलै २०२३ रोजी महावितरण कंपनीच्या अभियंता श्री शेंडगे यांना निवेदन देवून पगार करण्याची मागणी करून देखील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात आले नाही म्हणून रयत सेना व बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्यांच्या वतीने दि २० जुलै रोजी तहसील कार्यालय आवारात ५ तास धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेऊन नायब तहसीलदार धनराळे व शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे व दिलीप कॉन्ट्रॅक्टरचे ज्ञानेश्वर पाटील यांना ८ दिवसात पगार देण्याच्या सुचना करून बाह्य स्त्रोत कर्मचारी लखन काळे यांना सहा अभियंता संजय सरताळे व लाईनमन विठ्ठल राठोड यांनी तुटलेल्या पोलवर चढविल्याने त्यांचा अपघात झाला त्यातून कर्मचाऱ्यांस गंभीर दुखापत झाली महावितरण कंपनीचे सहा अभियंता सरताळे व लाईनमन राठोड यांना बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्यांना पोलवर चढविण्याचे अधिकार नसताना लखन काळेच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी देण्याच्या सुचना केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी ८ दिवसात पगार न दिल्यास पुढील आंदोलन आक्रमक राहील असा इशारा रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी दिला आहे . रयत सेनेने केलेल्या आंदोलनामुळे कामगारांना न्याय मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी रयत सेनेचे धन्यवाद व्यक्त केले.आंदोलनात रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोकुळ पाटील,शेतकरी सेनेचे जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे ,रमेश पवार,जिल्हा संघटक विशाल सूर्यवंशी,शहराध्यक्ष छोटू अहिरे,विभागप्रमुख अमोल पाटील तसेच अमोल पगारे, प्रसाद गवळी,अभिजीत शिंदे, कुणाल पाटील, प्रदीप आमले, आकाश पाटील, अविनाश पाटील ,राकेश पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील ,केतन झाल्टे, प्रवीण झोडगे ,शुभम चौधरी, शुभम नवले,भूषण पाटील, यांच्यासह १०४ बाह्य स्त्रोत कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.