संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.मा.श्री. ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम अंत्योदय आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी भास्कर मोहन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नक्कीच भास्कर पाटील यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीमत्वाचा संघटना वाढीसाठी भविष्यात लाभ होईल असे मत माजी आमदार स्मिताताई पाटील यांनी नोंदविले.
आपल्या हातून चांगले कार्य घडो तसेच राजकीय व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत मा.भास्कर पाटील यांच्या नियुक्ती बद्दल हार्दिक अभिनंदन.
स्मिताताई वाघ यांच्या हस्ते भास्कर पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते
मा श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब (भाजपा प्रदेशध्यक्ष) मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री), मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री), मा.श्री. विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), मा. श्री. रविजी अनासपुरे (प्रदेश मुख्यालय प्रभारी), मा. खासदार उन्मेशदादा पाटील, मा. आमदार राजुमामा भोळे, मा. आमदार मंगेशदादा चव्हाण, माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, जळगाव लोकसभा प्रमुख राधेश्याम चौधरी, प्रदेशचिटणीस अजय भोळे जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पाटील, जळकेकर महाराज तथा अंत्योदय आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. धनराज पाटील यांनी देखील भास्कर पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..