महाराणा प्रतापांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा राजपूत संघटनांन सोबत अनेक सामाजिक संघटनांची मागणी

1 0
Read Time3 Minute, 14 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा वावा या मागणीसाठी महाराणा प्रताप प्रेमी नागरिक राजपूत समाज संघटना आणि सामाजिक संघटनांनी आज चाळीसगाव नगरपालिकेच्या प्रांगणात जमून चाळीसगाव च्या उपमुख्याधिकारी फडतरे मॅडम यांना निवेदन देऊन मागणी केली आहे तसेच या निवेदनाच्या प्रती चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण खासदार उन्मेश पाटील माजी आमदार राजीव देशमुख यांनादेखील देऊन त्यांनी या कामासाठी पाठपुरावा करून महाराणा प्रताप पुतळा व स्मारक होण्यास शासन दरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे
चाळीसगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर राजपूत समाज राहत असून या समाजाचे प्राबल्य तालुक्यात आहे त्याच प्रमाणे चाळीसगाव नगरपालिकेत नेहमीच पाचपेक्षा अधिक नगरसेवक समाजाचे निवडून येत असतात मात्र समाजाच्या मनात अनेक वर्षांपासून असलेली महाराणा प्रतापांचा पुतळा होण्याची इच्छा आज पर्यंत पूर्ण झाली नसून ती आता पूर्ण व्हावी व त्यासाठी सर्व समाज घटकांनी सहकार्य करावे असेही यावेळी सांगण्यात आले तसेच पुतळा पूर्ण होऊन लोकार्पण होईपर्यंत ही मागणी उचलून धरण्याचा देखील यावेळी निर्धार करण्यात आला
यावेळी चाळीसगाव शहरासह तालुक्यातील राजपूत समाजाचे नागरिक नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि राजपूत समाज संघटनांचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच बरोबर इतर समाजांचे देखील सामाजिक कार्यकर्ते संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते तर महाराणा प्रतापसिंह मिञ मंडळ चाळीसगाव, राष्ट्रीय राजपूत करणी सेना, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र,
लोकनायक तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान,राणी पद्मावती महिला मंडळ,हिरकणी महिला मंडळ चाळीसगाव, महाराणा प्रताप युवा सेना,रयत सेना चाळीसगाव, संभाजी सेना संघर्ष प्रतिष्ठान रयत क्रांती संघटना यांनी निवेदने दिलीत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.