Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघातर्फे शिंदे कुटुंबीयांना मदतनिधी सुपूर्द

0
0 0
Read Time2 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने निमगाव खलु येथील गणेश शिंदे यांच्या कुटुंबीयांना तेहतीस हजार सहाशे त्रेपन्न (३३६५३/- )रूपयांची मदत करण्यात आली . दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ अजिंक्य येळे यांच्या हस्ते शिंदे कुटुंबीयांना मदतीचा धनादेश देण्यात आला .३१ मार्च २०२२ रोजी झालेल्या अपघातात गणेश शिंदे यांच्या कुटुंबातील इयत्ता नववीत शिकणारी मुलगी व इयत्ता सातवीत शिकणारा मुलगा ह्या दोन्हीं बहीणभावाचे अपघाती निधन झाले .यामुळे गणेश शिंदे यांच्या कुटुंबीयांवर खूप मोठा आघात झाला .त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची आहे . त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या माध्यमातून राज्याध्यक्ष गौतम कांबळे व राज्य महासचिव विठ्ठल सावंत यांच्या उपस्थितीत मदतीचा धनादेश देण्यात आला .यावेळी राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळींबे , शिक्षक महासंघाचे समाजकल्याण विशेष शिक्षक प्रतिनिधी अंकुश चव्हाण, गणेश शिंदे,आश्विन वाघमारे, मच्छिंद्र निगडे, सतिश शिंदे,अशोक भोसले, रामदास जाधव , बालाजी अडसुळे इ.पदाधिकारीउपस्थित होते . महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या अवाहनाला शिक्षक बंधू भगिनींनी प्रतिसाद दिल्याबद्दल राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळींबे यांनी सर्वांचे आभार मानले .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: