संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- मुलींमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने शहर पोलीस स्टेशनच्या वतीने चाळीसगाव शहरातील विविध शाळांमध्ये मिलिंद पोंक्षे व गौरी संखे या मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
सुरक्षेततेचे भयचक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने पुढाकार घेतला आहे.आपल्या समाजातुन पुरोगामी बदल घडुन आले, तरी दुदैवाने स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तु या दृष्टीने पाहणाऱ्यांची संख्या आजही लक्षणीय आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणाहुन जाणाऱ्या मुलींची छेडछाड, पाठलाग करणे,वाईट नजरेने बघणे अशा अनेक घृणास्पद घटना वारंवार उजेडात येत आहेत.हल्ली कोवळ्या वयात मुली पळुन जाण्याचे प्रमाण ही वाढले आहे आणि अशा गोष्टींचा अनुभव या वयातच येत असल्याने शालेय विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेचे भयचक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस हे विद्यालयात जाऊन जनजागृती पर अभियानाचे आयोजन करत आहे.
जाणीव या विषयावर शाळेतील विद्यार्थीनीना व्याख्यान देऊन चांगले व वाईट कसे ओळखायचे, मुलींनी कसे वागायचे, समाजात सुरक्षित कसे रहावे, विचार, संस्कार, भय, स्पर्श, प्रलोभन, आकर्षण, वर्तणुक, व्यसन या विषयांवर मुलींचे आत्मभान जागृत करून त्यांना स्वतःची ओळख करून देण्यासाठी प्रबोधनपर व्याख्यान देण्यात येणार असून तसेच मुलींकडुन येणाऱ्या तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर त्या सोडवण्याचा प्रयत्न पोलीस दलातर्फे करण्यात येणार असल्याचे देखील पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले आहे.
व्याख्यानाचे आयोजन जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर(पवार) व उपविभागीय पोलिस अधिकारी राजेशसिंह चंदेल मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी केले असून या व्याख्यानाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलिमा डोळस व पोह राहुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे
मिलिंद पोंक्षे याचे व्याख्यान दिनांक 16/01/2025
| सेंन्ट जोसेफ शाळा बिलाखेड | सकाळी 8 वाजता |
| पोद्दार इंन्टरनॅशनल स्कुल चाळीसगाव | सकाळी 10.50 वाजता |
| चंपाबाई कळंत्री विद्यालय धुळे रोड चाळीसगाव | दुपारी 3 वाजता |
मिलिंद पोंक्षे याचे व्याख्यान दिनांक 17/01/2025
| राष्ट्रीय कन्या शाळा छत्रपती शिवजी महाराज चौक चाळीसगाव. | सकाळी 7.30 वाजता |
| काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय भडगाव रोड चाळीसगाव | सकाळी 10.30 वाजता |
| डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय चाळीसगाव. | दुपारी 12.30 वाजता |
| तेहजिब स्कूल कादरी नगर चाळीसगाव | दुपारी 3 वाजता |
गौरी संखे यांचे व्याख्यान दिनांक 16/01/2025
| आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कुल चाळीसगाव | सकाळी 8 वाजता |
| चंपाबाई कळंत्री विद्यालय धुळे रोड चाळीसगाव. | सकाळी 11 वाजता |
| यशवंत माध्यमिक विद्यालय टाकळी प्र. चा. चाळीसगाव | दुपारी 1 वाजता |
गौरी संखे यांचे व्याख्यान दिनांक 17/01/2025
| तेहजीब स्कूल कादरी नगर चाळीसगाव | सकाळी 8 वाजता |
| गुडशेपफर्ड शाळा स्टेशन रोड चाळीसगाव | सकाळी 10 वाजता |
| जयहिंद माध्यमीक विदयालय मालेगाव रोड | दुपारी 2 वाजता |
