अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी) – सावदा पोलीस ठाणे हद्दीतील रणगाव (ता. रावेर) येथे गावठी देशी बनावटीचा रिव्हॉल्व्हर बाळगून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या २४ वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानीक गुन्हे शाखा, जळगाव) यांना रणगाव येथे एक इसम कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यांनी तत्काळ माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून तत्काळ रणगाव येथे रवाना केले,पथकाने सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडे गावठी बनावटीचा रिव्हॉल्व्हर (किंमत अंदाजे ४०,००० रुपये) मिळून आली,आरोपीची ओळख किरण ब्रिजलाल कोळी (वय २४, रा. रणगाव, ता. रावेर, जि. जळगाव) अशी झाली आहे.
या प्रकरणी पोकॉ सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्र. १९७/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व स्थानक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोउनि. सोपान गोरे, पोहेकॉ. प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, पोना. विकास सातदिवे, पोकॉ. बबन पाटील, सचिन घुगे, प्रदिप सपकाळे, मयुर निकम व चा. पोहेकॉ. भारत पाटील (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांचा समावेश होता.
