Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्त रयत सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0
0 0
Read Time3 Minute, 3 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव – रयत सेनेच्या वतीने राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्त पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप दि २७ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.


रयत सेनेच्या वतीने दि २७ रोजी सकाळी १० वाजता पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात
शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांना गेल्या १० वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वाटप रयत सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमात ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. रयत सेना सर्वांगीण समस्या सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असते वंचित घटकाच्या प्रश्नासाठी नेहमी रयत सेना कटीबद्ध राहणार आहे . गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून दरवर्षी रयत सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे आयोजन करीत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत शिक्षक सेनेचे शहर अध्यक्ष सचिन नागमोती यांनी केले . याप्रसंगी प्रदेश समन्वयक पि एन पाटील,प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे ,प्रदेश सचिव प्रमोद वाघ ,रयत सेना जिल्हा अध्यक्ष संजय कापसे ,रयत शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्पन्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे ,दिपक देशमुख,भरत नवले,छोटु अहिरे,भूषण पाटील,श्याम पाटील,दिलीप पवार,अनिल पवार ,भावेश पगारे ,संतोष कदम,बाळु पवार ,सुनील पवार,सुभाष जाधव आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: