Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्ती,एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार

0
0 0
Read Time1 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज

सनी घावरी

रावेत येथील जलशुद्धीकरण
केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (
दि.25) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसी
पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा
पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.

एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व
दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
सुरु राहणार आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून शहरातील
पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी,सीएमई,आर अँड डी व्ही, एसएसएनएल, दिघी, तळवडे,चाकण, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्रवारी (दि.26) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा
होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीचे उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: