अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)– आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनमंच पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव येथे १२ जुलै रोजी संपन्न झाली.
बैठकीस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. संदीपदादा लांडगे आणि प्रदेश प्रभारी संघटक मा. देविदास वाघ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जिल्हास्तरीय या बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणे, सामान्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे तसेच आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार उभे करणे, संघटन बळकट करणे आदी विषयांवर चर्चा झाली.
बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कार्यकर्ते मा. सुरेश अर्जुन वेळीस यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर. वाघ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
पदभार स्वीकारल्यानंतर नूतन तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस यांनी, “पक्षाचे विचार व धोरण घराघरात पोहोचवून चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रीय जनमंच एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेईन,” असे आश्वासन दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीपदादा लांडगे, जिल्हाध्यक्ष देविदास हटकर यांसह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शहर सचिव सचिन शेटे यांनी केले.
