अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव प्रतिनिधी – भारत सरकार द्वारा रेल्वे प्रशासनाचा भारत भरात मोठा विस्तार आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात रेल्वे मध्ये प्रवासी अधिकृतपणे तिकीट काढून प्रवास करतात तर रेल्वे प्रत्येक तिकीटा मागे कर घेते रेल्वेमध्ये प्रवास करीत असताना काही प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास तसेच काही प्रवाशांना हृदयविकाराचा झटका आल्यास त्यांना प्राथमिक उपचार मिळावे म्हणून सर्व रेल्वेमध्ये मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याची मागणी रेल्वेमंत्री यांच्या कडे चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक द्वारा रयत सेनेने निवेदनाद्वारे दि ११ रोजी केली आहे,
निवेदनात म्हटले आहे की रेल्वेमध्ये प्रवास करीत असताना काही प्रवाशांची प्रकृती बिघडते शिवाय काही प्रवाशांना हृदयविकाराचा झटका आल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार व्हावेत व काही महिला प्रवास करीत असताना रेल्वेत प्रसूतीची वेळ आल्यास अशा वेळेस रेल्वेस्थानकाची वाट पाहून तेथे उतरून रुग्णालयात जावे लागते यात जास्त वेळ गेल्यास प्रवासी दगावण्याची शक्यता असते म्हणून रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे गाड्यांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा पुरविल्यास प्रवाशांना आरोग्याची दुष्टीने मोठी सोय होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे गाड्यांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी वैद्यकीय पथकासाठी आय सी यु युक्त एक बोगी प्रत्येक रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित ठेवावी यामुळे एखाद्या प्रवाशास रेल्वेत प्रवास करत असताना त्रास झाल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार होऊन त्यांचे प्राण वाचू शकतात अत्यावश्यक सेवा पुरविण्याची रेल्वे प्रशासनाची जबाबदारी असल्याने दि १५ ऑगस्ट २०२२ च्या आत आमच्या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रत्येक रेल्वे गाडीत वैद्यकीय सेवा मोफत पुरवली नाही तर दि १५ ऑगस्ट २०२२ रोजी रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात तीव्र आंदोलन पुकारले जाईल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे दि ११ रोजी रेल्वेमंत्री यांना चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक द्वारा दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे, विवेक देठे ,अमोल पाटील,मंगेश देठे आधार महाले ,संजय देशपांडे ,मिलिंद परदेशी, नाना पवार ,पंकज गवळी ,प्रकाश चव्हाण, ज्ञानेश्वर नवले, दीपक देशमुख, प्रशांत अजबे, शिवाजी पवार, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष खुशाल बिडे यांच्या सह्या आहेत