शहर पोलिसांचा रात्रीचा गस्त संशय आल्याने पाठलाग करत चंदन चोरांना घेतले ताब्यात

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- रात्रीच्या वेळी पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असतांना अंध शाळे जवळ संशयितरित्या दोन तरुण दिसल्याने त्यांना थांबविले असता ते न थांबल्याने पाठलाग करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी थांबवत झडती घेतली आणि अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीचे तीन किलो चंदन आढळून आल्याने शहर पोलिसांनी घेतले दोन्ही आरोपींना ताब्यात.
मा. पोलीस अधिक्षक सो. श्री. एम. राजकुमार यांचे आदेशान्वये तसेच मा. श्री रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परीमंडळ, मा. श्री अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधिक्षक चाळीसगाव उपविभाग यांचे मार्गदर्शानाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे शोध पथकाची नव्याने रचना करण्यात आलेली आहे. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस स्टेशन हद्दीत मालमत्ते संदर्भातील चोरीचे गुन्हे होऊ नयेत या साठी योग्य त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर आळा घालणेकामी पोलीस स्टेशन हद्दीत विभागनिहाय कर्मचारी नेमुन दिवसा व रात्री परीणाम कारक दररोज गस्त नेमण्यात येते. सदर कर्मचारी यांनी मागील काळात चोरीचे गुन्हे करणाऱ्यावर प्रतिबंध करुन, तसेच सदर चोरट्यांना जेरबंद करुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. अश्याचप्रकारे काल दि.5 सप्टेंबर रोजी रात्री रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक बिरारी व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांची रात्रगस्त कामी पोलीस स्टेशन कडुन नेमणुक करण्यात आलेली होती. सदर अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सुचना मा. पोलीस निरीक्षक श्री संदिप पाटील यांनी गस्तकामी दिलेल्या होत्या. सहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक बिरारी, चालक पोहेकॉ नितीन वाल्हे, पोकॉ विजय पाटील, पवन पाटील, समाधान पाटील असे शहरात शासकीय वाहनावर चाळीसगाव शहरात दि. 06 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 3 वाजून 30 मिनीटांच्या सुमारास गस्त करीत असतांना, त्यांना भडगाव रोड अंध शाळेजवळुन दोन संशयित इसम मोटर सायकलवर एका पिशवीत काहीतरी घेवुन जातांना दिसले तेव्हा सहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक बिरारी यांनी सदर संशयित इसमांना थांवण्याचा इशारा केला असता ,ते इसम न थांबता त्यांचेकडील मोटर सायकलीवर भरधाव वेगाने पळुन जाऊ लागले. त्यांचा शासकीय वाहनाच्या सहाय्याने पाठलाग करुन त्यांना पळुन जाण्याची संधी न देता, सदर इसमांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकडले. सदर ठिकाणी लागलीच दोन पंचांना बोलावुन सदर इसमांकडील पिशवी चेक केली असता, सदर पिशवीत अंदाजे 15 हजार रुपये किमतीचे 3 किलो वजनाचे चंदनासारखे दिसणारे लाकुड व झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारी एक कुन्हाड, गिरमीट, लोखंडी करवत असे साहीत्य मिळुन आले. तरी सदर संशयित इसमांनी कोठेतरी चंदनाचे झाड तोडुन त्यातील गाभ्याची चंदन काढुन त्याची चोरी केल्याचे प्रथमः दर्शनी दिसुन आल्याने त्यांना त्याबाबत विचारपुस करता त्यांनी कोणतीही समाधान कारक उत्तरे दिली नाहीत. सदर आरोपीतांचे ताब्यातुन एक मोटर सायकल दोन मोबाईल व वरील चंदन चोरी कामी लागणारे साहीत्य असा एकूण 58 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर आरोपीतांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरन 442/2023 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन जप्त करण्यात आलेले चंदनाचे वन विभागाकडुन परीक्षण करुन त्यांचेकडुन चंदन असल्याचा अभिप्राय घेवुन पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे. सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीतांची नावे १) शेख अमीन शेख हजिज वय ५२ वर्षे २) अशोक लक्ष्मण आव्हाड वय ४५ वर्षे दोन्ही रा. हस्ता ता. कन्नड जि. औरंगाबाद, अशी आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सो. श्री एम. राजकुमार, मा. श्री रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक सो. चाळीसगाव परीमंडळ, मा. श्री अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधिक्षक चाळीसगाव उपविभाग यांचे मार्गदर्शानाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री संदिप पाटील, मा. श्री राहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक बिरारी, पोना महेंद्र पाटील, भुषण पाटील, पोकों विजय पाटील, समाधान पाटील, पवन पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, रविंद्र यच्छे, ज्ञानेश्वर गिते, ज्ञानेश्वर पाटोळे असे कर्मचारी व अधिकारी यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोना महेंद्र पाटील व पोकॉ विजय पाटील हे करीत आहेत.