संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शहरात सुरू असलेल्या शासकीय बांधकामांवर कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय बांधकाम मजूर काम करत आहेत,याकडे संबंधित विभागतील अधिकारी अभियांतांचे दुर्लक्ष अपघात झाल्यास जबाबदार कोण?
शहरात विविध विकास कामांचा धडाका सुरू असून अनेक शासकीय इमारतींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जोरात सुरू आहे.मात्र या बांधकामावर बांधकाम मजुरांना कोणती सुरक्षा उपकरणे संबंधित ठेकेदाराकडून पुरविण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे याकडे संबंधित विभागाच्या अभियांतांनी देखील जाणीवपूर्वक पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट दिसत आहे,जर संबंधित बांधकामांवर काही अपघात झाला त्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उभा राहत आहे,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येक शासकीय कामांवर शासकीय अभियंता यांची नियुक्ती केलेली असते संपूर्ण बांधकाम शासकीय नियमानुसार सुरू आहे की नाही तसेच. शासन नियमांचे पालन करत बांधकाम सुरू आहे की नाही यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित अभियांतावर असते मात्र बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नुसते सुरक्षा फलक लावण्यात आले आहे.ज्यात सुरक्षा प्रथम साईटवर हेल्मेट वापरा,बुट घालून साईटवर प्रवेश करा अशी मजकूर लिहिण्यात आली आहे मात्र हे फक्त फलकावर लिहिण्यात आले आहे,अंमलबजावणी केलेली नाही हा ठेकेदारांचा मनमानी कारभार आहे की संबंधित अभियंता यांची सुट पण मजुरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे याकडे संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी लक्ष देत सदर अभियंता व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.