शिवनेरी फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी तर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांच्याकडे 1000 मास्क सुपूर्द

Read Time1 Minute, 59 Second

चाळीसगांव(प्रतिनिधी):-चाळीसगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून करोना विषाणू व त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवापाड कष्ट घेत असून सुदैवाने अजून एकही रुग्ण आढळून आला नाही मात्र राज्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेची देखील जबाबदारी वाढत आहे. मागील 3 दिवसात हजारोंच्या संख्येने मुंबई – पुणे व इतर राज्यातून नागरिक चाळीसगाव तालुक्यात आले असून
चाळीसगाव तालुक्यातील आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, नर्सेस व आरोग्य विभागाचा स्टाफ हा त्यांची माहिती गोळा करून पुढील 14 दिवस त्यांना काही लक्षण आढळून येतात का याची दररोज प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेणार आहेत. या सर्व आरोग्य सेवकांच्या आरोग्यासाठी सामाजिक भान जपत आपण देखील समाजाचे देणे लागतो या जाणिवेतून शिवनेरी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या वतीने १००० मास्क नुकतेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी शिवनेरी फाउंडेशन च्या अद्यक्षा सौ प्रतिभाताई मंगेश चव्हाण,भाजपा शहर सरचिटणीस जितेंद्रदादा वाघ, ग्रामीण सरचिटणीस अमोलदादा चव्हाण आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दुकानातून कोणतीही वस्तू घ्यावयाची असेल तर पाच फूट अंतर ठेवून दुकानातील वस्तू खरेदी करण्याचे अहवाहन
Next post जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पंप असोसिएशन जिल्हा पुणे यांना पेट्रोल पंप बंद करण्याचे आदेश दिले आहे
error: Content is protected !!
%d bloggers like this: