अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगांव(प्रतिनिधी)दि 5-चाळीसगाव येथील अनिल नगर येथील नगरपालिका सार्वजनिक शौचालय चे केअर टेकर मनमानी करत असल्याचा आरोप करत येथील रहिवाशीयांनी आज दि 5 ऑक्टोबर 2020 सोमवार रोजी नगरपालिका मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की केअर टेकर सार्वजनिक शौचालयात पाण्याची व्यवस्था असून सुद्धा पाणी साठवत नाही व शौचालयाची साफ सफाई सुद्धा करत नाही या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो जर नागरिकांनी जाऊन सांगितले असता नागरिकांशी भानगडी करतात तसेच आरोग्य निरीक्षक आमचे नातेवाईक आहे आमचं काही होणार नाही अशी भाषा वापरतात या पूर्वी नागरिकांनी वार्डातील नगरसेवकांना या पूर्वी सांगितले पण काही फायदा झाला नाही परिस्थितीत तशीच आहे, मोठ्या आशेने मुख्याधिकारी साहेबांना आज चिराग शेख नगरसेवक व बबन पवार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे मुख्याधिकारी साहेब काय कारवाई करतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष आहे .या निवेदनावर आनंद शिराळ,संतोष मोरे,संग्राम निकम,मुज्जमील अहमद,प्रवीण गवळी,सागर निकम,अनिल कवडे,प्रकाश चव्हाण,तौफिक शेख,चेतन जगताप आदींच्या सह्या आहेत.