अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक निकाळजे यांच्या आदेशाने व दौंड तालुकाध्यक्ष मा सचिन खरात यांच्या नेतृत्वामध्ये आज दी 12 डिसेंबर 2022 रोजी निवेदन देत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रमहापुरुषांबद्दल जे अवमानित करणारे वक्त्यव्य केले आहे,त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल जनसामान्यांना नितांत आदर आहे चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक् मागून शाळा चालू केल्या असे बेताल वक्तव्य करून या महापुरुषांबद्दल द्वेषपूर्ण भावनेने जाणूनबुजून अवमानित विधान केले आहे, तसेच जनसामान्यांच्या भावना दुखावल्या आहेत जनसामान्यांच्या मनामध्ये या महापुरुषांबद्दल नितांत आदर आहे त्यामुळे चद्रकांत पाटील यांनी केलेले वक्त्यव्य हे जनसामान्यांच्या भावना दुखावनारे आहे त्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित नियम 2015 नुसार कायद्याच्या 3(1) U, 3(1)V IPC 295, 34, नुसार तक्रार दाखल करावी असे निवेदन दौंड पोलीस स्टेशन ला देण्यात आले,यावेळी रिपाई ए चे दौंड तालुका उपाध्यक्ष मा रामभाऊ देवडे, रिपाई चे वाहतूक अध्यक्ष संजय अहिरेल्लू, रिपाई विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभय भोसले, रिपाई चे आकाश वाघमारे व कार्यकर्ते उपस्थित होते.
