Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

आता चाळीसगाव एम एच 52 आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश…

0
0 0
Read Time4 Minute, 26 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)- बोलायचे तर करायचे अशी भूमिका आमदार मंगेश चव्हाण यांची नेहमीच असते या ठाम भूमिकेचा बळावर पाठपुरावा करत त्यांच्या प्रयत्नाने शेवटी शहराला नवीन ओळख मिळाली असून स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास(आरटीओ) महाराष्ट्र शासनाची मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे.
यामुळे नक्कीच चाळीसगावकरांच्या 120 किलोमिटर जळगांव येथे वाहन पासिंग साठी होणाऱ्या फेऱ्या थांबणार आहेत आमदार चव्हाण यांनी सोशल मीडियावर एम एच 52 कसे राहणार अशी पोस्ट टाकल्यावर अनेक चर्चांना उधाण आले होते पाचोरा येथे कार्यालय होणार अशी देखील चर्चा सुरू होती आणि आमदार किशोर पाटील यांचे प्रयत्न देखील मात्र सर्व चर्चा थांबवत एम एच 52 ची सुरवात चाळीसगावात होणार महाराष्ट्र शासन मान्यतेचे पत्र प्राप्त झाले असून चाळीसगावकरांसाठी आनंदाची बाब आहे.आगामी अधिवेशनात सदर खर्चाची पुरवणी मागणी द्वारे केली जाणार असल्याचे देखील शासन निर्णयात म्हटले आहे,आता लवकरच जागा पाहून कार्यालयाचे काम सुरू होणार म्हणून चाळीसगावकरांसाठी आता प्रतीक्षा फक्त कार्यालय सुरू होण्याची.

MH52 चाळीसगावची नवी ओळख…

चाळीसगाव येथे परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून नुकताच त्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन ही चाळीसगावची नवी ओळख होणार असून आपला वाहन पासिंग क्रमांक MH52 असा असेल.

जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना आपल्या वाहन पासिंग व RTO संदर्भातील कामांसाठी १२० किमी दूर जळगाव येथे ये जा करावी लागत होती. त्यात पूर्ण दिवस प्रवासात जात असल्याने वेळ व श्रम वाया जात होते. दुर्दैवाने या प्रवासात अनेकांचे अपघात देखील झाले होते.

चाळीसगाव वासीयांच्या भावनांची व माझ्या पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, श्री. अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री श्री. गिरीषभाऊ महाजन व परिवहन विभागाचे सर्व सन्मा. अधिकारी वर्ग यांचे मनापासून आभार मानतो,

चाळीसगाव वासीयांसाठी हा निर्णय ऐतिहासिक व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा आहे. चाळीसगाव च्या विकासात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मैलाचा दगड ठरेल हा मला विश्वास आहे.

चाळीसगावकरांनी आमदार म्हणून मला आपल्या सेवेची संधी दिली, त्यामुळेच चाळीसगावच्या हितासाठी अहोरात्र काम करता येत आहे. समस्त चाळीसगाव वासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

आमदार मंगेश रमेश चव्हाण

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: