अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- परिसरात काल संध्याकाळ पासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील नदीला पूर तर काही ठिकाणी दुकानांसह लोकांच्या घरात शिरले पाणी.
काल संध्याकाळी पाऊस सुरू झाला परिसरात देखील पाऊस सुरू असल्याने शहरातील तितूर नदीला पूर आला असून दयानंद हॉटेल जवळील पुलाच्या व नवीन झालेल्या संगम सेतू पुलाच्या खालून पाणी वाहत आहे.तसेच शहरातील अनेक संकुलातील नागरिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले आहे या सोबतच परिसरातील अनेक लोकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे,यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून एका दिवसाच्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे.

शहरातील हिरापूर रोड वरील बेदमुथा कॉम्प्लेक्स च्या तळमजल्यामध्ये गळ्यामध्ये पूर्णपणे पाणी भरले आहे यामुळे येथील व्यावसायिक नुकसानाच्या चिंतेत हतबल पाहायला मिळाले.याबरोबर भडगाव रोड वरील घाटे कॉम्प्लेक्स मधील तळ मजल्यावरील गाळ्यांमध्ये पाणी शिरले आहे नेमके शहरात कितीचे नुकसान झाले आहे माहिती आजुन समोर आली नसून व्यापाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करत मदत उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली आहे.
प्रशासनाच्या दूरदृष्टीने जीवित हानी टळली

काल सुरू झालेल्या परिसरातील पावसाची परिस्थिती पाहता तहसीलदार प्रशांत पाटील व नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी आणि तात्काळ रात्री ११ वाजेच्या सुमारास पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात जात नदीच्या वर असलेल्या दुकानदारांना दुकाने खाली करण्याचे सांगितले तसेच दुकानामध्ये बाहेर गावावरून आलेल्या भाविक देखील देखील थांबलेले होते त्यांना स्थलांतरित करण्यात आले जेणे करून पुराच्या पाण्यात काही जीवित हानी होऊ नये आणि प्रशासनाच्या दूरदृष्टीने दर्गा परिसरातील पुढील अनर्थ टळला.
ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ऍक्टिव्ह
जशी तालुक्यातील पाटणादेवी येथील मंदिराच्या परिसरात नदीला पूर आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी देताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी रात्री सोशल मीडियावर तात्काळ मेसेज करत भाविकांना सूचना देत काळजी घेण्याचे आवाहन केले यामुळे त्यांनी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होत लोकांना ऍक्टिव्ह करून पुढील अनर्थ टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाल्याचे दिसत आहे.
आदर्श कॉलनी जयहिंद कॉलनी देखील पाण्यात..

शहरातील विविध विभागातील शासकीय अधिकारी कर्मचारी,शिक्षक तसेच अनेक मान्यवर राहत असलेल्या आदर्श कॉलनी,जयहिंद कॉलनी ला देखील काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे रस्त्यावर वाहणारे आणि घरात शिरलेले पाण्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
नगरपालिका प्रशासन सज्ज
नगरपालिका सफाई कर्मचारी पुन्हा सज्ज झाले असून पाणी साचलेल्या परिसराची माहिती घेत पाण्याचा निचरा करण्याचे कार्य सुरू केले आहे.पाण्याला वाट करून देण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
पाटणादेवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडले

चाळीसगाव हद्दीपासून दोन किलोमीटर अंतरावर पाटणादेवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाऱ्यामुळे लिंबाचे भलेमोठे झाड पडल्याने वाहतूक खोळंबली आहे त्या झाडाला स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी संदीप पाटील यांना रस्त्याच्या कडेला करण्याचे कार्य सुरू केले आहे.
