अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
अमळनेर(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मोठी कारवाई केली. मुक्ताईनगर येथे सापळा रचून वाहनासह तब्बल ₹१ कोटी २ लाख ३३ हजार ४६०/- किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आज दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, मुक्ताईनगर परिसरात प्रतिबंधित गुटखा वाहतूक होणार आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. सलीम तडवी, पोकॉ. छगन तायडे, पोकॉ. रतन गीते, पोकॉ. मयूर निकम व चापोहेकॉ. भरत पाटील असे पथक तयार करून कारवाईचे आदेश देण्यात आले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व पंच यांच्यासह पथकाने मुक्ताईनगर येथील सारोळा फाटा येथे नाकाबंदी करून संशयित वाहन थांबवले. तपासणीदरम्यान वाहनातून राज्यात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
१) आशिष राजकुमार जयस्वाल, रा. ममोरी, वार्ड क्र. १४, देवास, मध्यप्रदेश
२) आशिफ खान बुल्ला खान, रा. शिवशक्ती नगर, दत्तवाडी, नागपूर
दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाहो ही पोलीस अधीक्षक जळगांव, डॉ महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक, अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे मार्गदर्शनाखालो पोउपनि, सोपान गोरे, पोहेकॉ सलोम तडत्री, पोकों छगन तायडे, पोकां/रतन गिले, पोकों/मयुर निकम, चापोहेको भरत पाटोल स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी केली आहे.
