Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चंडिकादेवी डोंगरी नदीवर पुल उभारण्यासाठी रयत सेनेची संभाजीनगर अधीक्षक पुरातत्त्वविद ,भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी.

0
0 0
Read Time7 Minute, 5 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक(शेख)

चाळीसगाव (प्रतिनिधी) -नवरात्र उत्सवात तसेच वर्षवर चंडीकादेवीचे दर्शन घेण्यासाठी चाळीसगाव सह महाराष्ट्रातुन भाविक येत असतात डोगरी नदीवर पुल नसल्याने भाविकांना नदीतील दगड व पाण्यातून मार्ग काढत दर्शनासाठी जावे लागत असल्याने लहान मुले . माहिला.वयोवृद्ध नागरिकांचे हाल होत असल्याने संभाजीनगर पुरातत्त्वविद ,भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दोन दिवसात पुल उभारावा असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने चंडीकादेवी येथील डोगरी नदीपात्रातील पाण्यात बसून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाला दि ३ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.
चंडिका देवी ( पाटणादेवी ) हे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत एकमेव द्वितीय असे राष्ट्रीय स्मारक आहे. महाराष्ट्रभरातील हिंदु धर्मीयांचे पाटणादेवी हे कुलदैवत देखील आहे. या राष्ट्रीय स्मारकाचे आपल्या विभागाला विसर पडला असल्याचे वेळोवेळी निर्देशनास आले आहे.संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाने डोगरी नदीवर पुल बसविण्यात यावा यासाठी यापूर्वी अनेकानी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर ही पुरातत्त्वविद ,भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून या मागणी कडे दुर्लक्ष केले गेले आहे.
मागील वर्षीच्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका ठेकेदाराने स्वखर्चाने डोंगरी नदीवर पुलाची उभारणी केली होती मात्र भारतीय पुरातत्त्व विभागाने त्यांना बिल अदा केले नाही व त्यांना पूल काढून घेण्यास सांगितल्याने संबंधित ठेकेदाराने नाईलाजास्तव लोखंडी पुल काढून घेतला. यामुळे नवरात्र उत्सव २०२२ वर्षात भाविकांचे प्रचंड हाल झाले आहे. महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी चंडीकादेवी येथे येतात. सुदैवाने या नवरात्र उत्सवा दरम्यान पाटणादेवी अभयारण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने डोंगरी नदीला पूर आला आता पाणी ओसरल्यानंतर नदीवर पुल नसल्यामुळे भाविकांना देवीचे दर्शन दुर्लभ तथा अशक्य झाले आहे. कारण नदी ओलांडल्याशिवाय देवीचे दर्शन घेणे अशक्य आहे. कुठलाही पर्यायी मार्ग नाही.
सद्यस्थितीत भाविकांना दर्शनासाठी अक्षरशः डोंगरी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मार्गक्रमण करावा लागत आहे. या नदीत शेवाळलेले दगड गोटे व झाडांच्या मुळ्या देखील आहेत. यामुळे आभाल वृद्ध भाविकांना इजा होऊन दुखापत होत आहे. भाविकांच्या रोख स्वरूपातील देणगीतून , तसेच दान केलेल्या सोन्या-चांदीच्या अलंकारातून गेल्या दीड ते दोन वर्षात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या तिजोरीत लाखो रुपये जमा झाले आहे. या मोबदल्यात भारतीय पुरातत्त्व विभागाने भाविकांना कुठल्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत ज्या भाविकांच्या जीवावर आपल्या राष्ट्रीय स्मारकाची उंची व वैभव वाढले आहे ,त्या भक्त भाविकांची अशी दुरवस्था संयुक्तिक आहे का ?
नवरात्र उत्सव २०२२ येणार ही माहिती असताना पुरातत्त्व विभागाने चंडिका देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून येणाऱ्या भाविकांसाठी डोंगरी नदीवर पुलाची उभारणी का केली नाही. आपल्या विभागाची जबाबदारी असताना डोंगरी नदीवर पुल उभारला नाही. म्हणून दि ५ ओक्टोबर २०२२ पर्यंत नदीवर पुलाची उभारणी पुरातत्त्व विभागाने केली नाही तर भाविकाना सोबत घेऊन रयत सेनेच्या वतीने चंडीकादेवी येथील डोगरी नदीच्या पात्राच्या पाण्यात बसून आंदोलन करणार असल्याचे भारतीय पुरातत्त्व विभागाचे कार्यालयीन सहाय्यक श्री देव यांना रयत सेनेच्या वतीने दि ३ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तसेच पुढील आंदोलन संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर व्यापक असे रयत सेनेच्या वतीने जन आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष नितीन महाजन, सागर जाधव ,राकेश निकम, किशोर जाधव ,गुलाब राठोड, राहुल पाटील ,समाधान वाणी ,प्रेमचंद चव्हाण, पुनमचंद जाधव, किरण शेवरे, भारत जाधव, किरण जाधव, विनायक पाटील, प्रवीण येवले, प्रभाकर महाजन, चेतन माळी, विजय वेळे, मनोज धनगर, देविदास चौधरी, कारभारी पवार, शिवदास गायकवाड, रोहित शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: