अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव उपविभागासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) पदावर विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद मागील काही काळापासून रिक्त होते.
तलाठीसह दोघांविरोधात लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई
विजयकुमार ठाकूरवाड सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे कार्यरत होते. पोलीस खात्यात प्रदीर्घ अनुभव असलेल्या ठाकूरवाड यांनी यापूर्वी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांच्या कार्यशैलीत काटेकोर शिस्त, प्रभावी निर्णयक्षमता आणि जनसंपर्कात पारदर्शकता यामुळे ते आधीच चाळीसगाव परिसरात परिचित आणि लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात.
चाळीसगाव उपविभागात येणाऱ्या विविध पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षमतेवर नियंत्रण ठेवणे, गुन्हेगारीला आळा घालणे, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
त्यांच्या नियुक्तीबाबत पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, “ठाकूरवाड यांचे पुनरागमन चाळीसगावसाठी फायदेशीर ठरेल,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. आगामी काळात त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कुशल नेतृत्वाच्या माध्यमातून चाळीसगाव उपविभागात शांतता, सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणाच्या दिशेने सकारात्मक बदल घडवतील,अशी अपेक्षा आहे.
