अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चालू वर्षात गहाळ झालेल्या मोबाईलबाबत संबंधित मोबाईलधारकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सायबर पोलिस स्टेशन, जळगाव यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात यश मिळविले आहे.
मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. सौ. कविता नेरकर (अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव) आणि मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मासिक क्राईम मिटिंगदरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार संबंधित कारवाई करण्यात आली.
सायबर पोलिस स्टेशन, जळगाव यांच्या तांत्रिक मदतीच्या आधारे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एकूण ११ मोबाईल संच (अंदाजे किंमत सुमारे १ लाख १० हजार रुपये) हस्तगत केले. हे मोबाईल आज दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी मा. सौ. कविता नेरकर आणि मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या हस्ते मूळ मोबाईलधारकांना परत देण्यात आले.
ही उल्लेखनीय कामगिरी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि श्री नितीन पाटील, सफौ युवराज नाईक, पोहेकॉ संदीप पाटील,पोकॉ विजय पाटील, पोकॉ बाळू बाविस्कर तसेच सायबर पोलिस स्टेशन जळगाव येथील पोना ईश्वर पाटील, पोकॉ गौरव पाटील, पोकॉ मिलिंद जाधव आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईलधारकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
