अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर
चाळीसगाव (प्रतिनिधी) – आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत चाळीसगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून यावेळी हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं ठेवण्यात आलं आहे.
राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या नवीन आरक्षण अधिसूचनेनुसार, जळगाव जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या यादीत चाळीसगाव नगराध्यक्ष पदावर कोणताही प्रवर्गनिहाय आरक्षणाची अट न ठेवता सर्वसाधारण प्रवर्गास संधी मिळाली आहे.
यामुळे आता शहरातील सर्व समाजघटकातील इच्छुक उमेदवारांना या प्रतिष्ठेच्या पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची समान संधी मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, चाळीसगाव नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबत नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना ऊत आला असून आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून,कोणता उमेदवार मैदानात उतरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
