अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
भुसावळ(प्रतिनिधी)- भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीस जेरबंद करून त्याच्याकडून तब्बल तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले असून चोरीच्या वाहनांची एकूण किंमत सुमारे २ लाख २५ हजार रुपये इतकी आहे.
फिर्यादी सुनील पांडुरंग इंगळे (रा. पांडुरंगनाथ नगर, भुसावळ) यांनी त्यांच्या रॉयल इनफिल्ड बुलेट या मोटारसायकल चोरीस गेल्याबाबत भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. येथे गुन्हा दाखल केला होता (गु. र. नं. 389/2025, बि.एन.एस. कलम 303(2)).
तपासादरम्यान पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार डी.बी. पथकाने मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील अरशद खान अहमदखान (वय 22, रा. खाजा नगर, आझाद नगर) बऱ्हाणपूर मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एका विधीसंघर्षित बालकाच्या साथीने चोरीची कबुली दिली.
आरोपीकडून खालील तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या :
1)रॉयल इनफिल्ड बुलेट 350 CC (क्र. MH-19-ED-7650) – किंमत १,२५,०००/- रुपये
2) बजाज प्लॅटीना 100 ES (क्र. MH-19-DS-3722) – किंमत ५०,०००/- रुपये
3)बजाज सी.टी. 100 (लाल रंग, विनानंबर) – किंमत ५०,०००/- रुपये
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ श्री. संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स.पो.नि. नितीन पाटील, पो.उपनि. मंगेश जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी विजय नेरकर, कांतीलाल केदारे, किरण धणगर, रविंद्र भावसार, सुनिल सोनवणे, सचिन चौधरी, हर्षल महाजन, जिवन कापडे, महेंद्र पाटील, जावेद शहा, भुषण चौधरी, अमर अढाडे, प्रशांत सोनार, योगेश माळी, योगेश महाजन आदींचा सहभाग होता.
आरोपीकडून एकूण २,२५,०००/- रुपये किंमतीच्या तिन्ही मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून पुढील तपास पोहेकॉ विजय बळिराम नेरकर करत आहेत.
