अधिकार आमचा न्युज नेटवर्क
अंबरनाथ(प्रतिनिधी)- नवस्वराज्य न्यूज युवा व ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त वर्धा येथे आयोजित समाजरत्न व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात समाजहितासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात लाईव्ह नवविचार न्यूजच्या मुख्य संपादिका सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांची निवड “समाजरत्न” या बहुमानासाठी झाली.
कार्यक्रमास काही कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र, त्यांच्या सन्मानचिन्ह घरी आल्यानंतर अंबरनाथ भाजपा शक्ती केंद्रप्रमुख सौ. स्वप्नाली संतोष शिंदे यांनी त्वरित त्यांचा सार्वजनिक सत्कार आयोजित करून हा सन्मान अधिक विशेष बनवला.
सेवा पंधरवड्याचा अनोखा उपक्रम
या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर साजऱ्या होणाऱ्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने करण्यात आली. “एक पेड़ माँ के नाम” या उपक्रमांतर्गत प्रभागातील महिलांना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही संकल्पना स्तुत्य ठरली.
सुनिता महाडिक – सत्य आणि समाजसेवेची लेखणी
पत्रकारितेतून उपेक्षित, वंचित व ग्रामीण जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या सुनिता ताईंचे कार्य समाजरत्न या किताबाला खरं सार्थक ठरतं. शेतकरी समस्या, शिक्षण, महिला प्रश्न, आरोग्य, सामाजिक न्याय या विषयांवर त्यांनी धडाडीने लिहिलं आणि समाजप्रबोधन घडवलं. त्यांची पत्रकारिता ही सत्यप्रिय, निडर आणि विधायक दृष्टिकोन देणारी आहे.
स्वप्नाली शिंदे यांचा पुढाकार
स्वप्नाली ताईंच्या जनसंपर्क कार्यालयातून झालेला हा सत्कार सोहळा केवळ एका पत्रकाराचा गौरव नाही, तर समाजकारणात नवा आदर्श ठरला आहे. त्यांच्या कार्यातून भाजपाचा लोकाभिमुख संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचेही यावेळी प्रकर्षाने जाणवले.
खरा सन्मान – लोकांचा विश्वास
सुनिता ताईंच्या संघर्षशील लेखणीतून अनेकांना आशेचा किरण मिळाला आहे. त्यांच्या धडपडीमुळेच त्यांना ‘समाजरत्न’ हा बहुमान मिळाला असून, हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
शुभेच्छुकांचा ओघ
या यशाबद्दल शाहू महाराज मराठा समाज मंडळ चाळीसगावसह अनेक मान्यवरांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजाच्या आशीर्वादामुळे व शुभेच्छुकांच्या पाठबळामुळेच हा गौरव अधिक अर्थपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
