अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि. २७ जुलै २०२५ डोनदिगर (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने विशेष मतदान कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात आले. खान्देश अध्यक्ष विनोद साळुंके यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
हेही वाचा
रोटरॅक्ट क्लब ऑफ चाळीसगाव क्लासिकच्या अध्यक्ष पदी -आकाश पोळ तर सचिव पदी हर्षल माळी
या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना मतदान नोंदणीबाबत जागरूक करून नवीन मतदार म्हणून नाव नोंदविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. डोनदिगर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या उपक्रमाचे स्वागत केले.
या कार्यक्रमावेळी महेश पाटील, पंकज चौधरी, सागर पाटील, सुनिल पाटील, परसराम जगताप, राजेंद्र पाटील, विशाल पाटील, अजय पाटील, प्रविण भालेराव, भुषण पाटील, जय चौधरी, वैजीनाथ पाटील, कमलेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. मतदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग वाढवण्यासाठी असे उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
