अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – दिनांक २६ जुलै २०२५ रोजी चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील घाटे कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) च्या मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री व अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अनिलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. संजय (भाऊसाहेब) पवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष मा. योगेशदादा देसले उपस्थित होते.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष मा. भाऊसाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांचे संघटन व पक्षबांधणीबाबत माहिती देत नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.
उपस्थित मान्यवरांनी पक्षबांधणीबाबत मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर अनिल पाटील – आमदार, अमळनेर विधानसभा,संजय (भाऊसाहेब) पवार – जिल्हाध्यक्ष व अध्यक्ष, जिल्हा बँक,योगेशदादा देसले – जिल्हा कार्याध्यक्ष,भाऊसाहेब पाटील – तालुका अध्यक्ष,अरविंदजी मानकरी – जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्या विभाग,कुशल देशमुख – प्र. युवक सरचिटणीस,तालुका उपाध्यक्ष,अभिलाषा ताई रोकडे –,मंगेश सावळे – तालुका सरचिटणीस,सामाजिक न्या वि तालुका अध्यक्ष खुशाल मोरे,नितीन भामरे – तालुका कार्याध्यक्ष,राजेंद्र राठोड तालुका उपाध्यक्ष,रवींद्र महाजन तालुका अध्यक्ष, ओबीसी सेल सोनालीताई देऊळकर – तालुका अध्यक्षा, महिला,गोकुळ पाटील – तालुकाध्यक्ष किसान सेल,किशोर जाधव – जिल्हा कार्याध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग,समाधान पाटील – शहराध्यक्ष, दीपक शिंदे – शहर उपाध्यक्ष,दीपक चौधरी – शहर कार्याध्यक्ष,करण पाटील, तालुका अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग,बापू आमले, अध्यक्ष उ.म. युवती,सोनाली ताई गुरव – विधानसभा महिला क्षेत्रप्रमुख,सुवर्णा ताई सोनार – सरचिटणीस, स्वाती ताई देवरे – जिल्हा कार्याध्यक्ष, युवती,निर्मला ताई चौधरी – शहराध्यक्षा,संदीप पाटील, साहेबराव मेंबर, रघु पाटील, विलास पाटील, भूषण देशमुख, विकास राठोड व इतर असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्यामुळे चाळीसगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
