अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गुड शेफर्ड अकॅडमी शाळेचे यश
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरात नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गुड शेफर्ड अकॅडमी, चाळीसगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अलौकिक यश संपादन केले.
के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेजच्या इंडोर हॉलमध्ये झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात गुड शेफर्ड अकॅडमीचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी ठरला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून विजयी संघामध्ये अनविका ज्ञानेश्वर पाखले, अक्षरा राहुल राजपूत, आदिती विवेक चव्हाण, ओवी अमोल पाटील व यज्ञा संजय सोनवणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्राजक्ता मनीषा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
याशिवाय, जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील किक बॉक्सिंग स्पर्धेत आसिया समीर शेख हिने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवला.
विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. मनोज गोरे व श्री. केतन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. डॅनियल दाखले सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
