Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

नगरपालिकेच्या उद्यानातील नळ व पाईपांची सजग नागरिकांनी केली स्वखर्चाने दुरुस्ती….

0
0 0
Read Time3 Minute, 27 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)- येथील स्व. सुवर्णाताई देशमुख उद्यानातील खराब झालेले नळ सजग नागरिक चाळीसगावकर व्हाट्सअप सोसलं मिडीया ग्रुप च्या वतीने नवीन बसविण्यात आले असून तुटलेले पाईप दुरुस्त करण्यात येऊन पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली आहे, सजग नागरिक चाळीसगावकर व्हाट्सअप ग्रूपच्या माध्यमातून एकत्रितपणे उद्यानात खर्च करण्यात आला असून आपल्या गावासाठी योगदान देवून चांगला प्रयत्न करने हे उद्दिष्ट ग्रूप चे राहणार असल्याचे ग्रुप सदस्यांनी सांगितले.

      शहरात जास्त समस्या नगर परिषदेच्या अंतर्गत असल्याने रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी व्हाट्सअप वर आम्ही सजग नागरिक चाळीसगावकर हा ग्रुप निर्माण केला असता व्हाट्सअप ग्रुप वर अनेक जागृत चाळीसगावकरांनी नगरपरिषद चाळीसगाव अंतर्गत असलेल्या समस्येवर अनेक मॅसेज टाकले त्यात चाळीसगाव शहरातील डॉक्टर, अभियंता यांनी एकत्रित स्व. सुवर्णाताई देशमुख उद्यानात नळ खराब झाले आहेत काही पाईप तुटलेले आहेत त्याची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याने आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून या उद्यानातील पाईप व नळाची दुरुस्ती करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार सजग नागरिक चाळीसगावकरांच्या सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुप वर सर्व सदस्यांनी आर्थिक मदत एकत्र करत उद्यानातील खराब झालेले पाईप व तुटलेले नळ नवीन बसवण्यासाठी डॉक्टर्स, इंजिनियर्स,वकील, व्यवसायिक, शिक्षक, पत्रकार आणी इतर सुजाण नागरिकांनी पुढाकार घेऊन कामे करून गावासाठी योगदान देवून चांगला पायंडा पाडला असून या पुढे देखील सजग नागरिक चाळीसगावकरांच्या वतीने विविध समस्या व वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सर्व ग्रुपच्या सदस्यांनी हा एक छोटा, परंतु प्रतिकात्मक प्रकल्प होता,आणी यानंतरही नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने हा सजग ग्रुप जनहितोपयोगी कार्य करनार असल्याचा निश्चय केला आहे.तसेच चाळीसगाव नगरपरिषद च्या वतीने शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या ना प्राधान्य देवून सोडविण्यासाठी प्रयत्नशील असावे अशी मागणी देखील नगरपरीषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे,

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: