अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)– शहरवासीयांसाठी रेल्वे विभागाकडून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे-अमरावती दरम्यान धावणाऱ्या हॉलिडे एक्सप्रेस (गाडी क्र. 01403/01404) ला आता चाळीसगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्यात आला आहे. हा थांबा येत्या 6 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार असून, ती 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत (फक्त सोमवारी/मंगळवारी) उपलब्ध राहणार आहे.
रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे चाळीसगाव शहरातील व परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत या मार्गावर थेट सेवा नसल्याने नागरिकांना जळगाव किंवा भुसावळमार्गे पर्यायी व्यवस्था करावी लागत होती.
गाडी क्र. 01403 – पुणे ते अमरावती
चाळीसगाव आगमन – सकाळी 04:28 वाजता
प्रस्थान – 04:30 वाजता
चालू कालावधी – 6 ऑक्टोबर 2025 ते 24 नोव्हेंबर 2025
गाडी चालण्याचा दिवस – सोमवार
गाडी क्र. 01404 – अमरावती ते पुणे
चाळीसगाव आगमन – सायंकाळी 17:13 वाजता
प्रस्थान – 17:15 वाजता
चालू कालावधी – 7 ऑक्टोबर 2025 ते 25 नोव्हेंबर 2025
गाडी चालण्याचा दिवस – मंगळवार
या गाडीमुळे पुणे व अमरावती येथे शिक्षण, नोकरी, वैद्यकीय आणि कौटुंबिक कारणांनी प्रवास करणाऱ्यांना अधिक सुलभता मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने हंगामी स्वरूपात हा थांबा निश्चित केला असला, तरी नागरिकांनी ही सेवा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
रेल्वे विभागाकडून मिळालेल्या या सुविधेचा लाभ अधिकाधिक प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन स्थानिक रेल्वे समिती सदस्यांनी केले आहे.
