अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- २७ सप्टेंबर २०२५ रोजी
श्री महालक्ष्मी मित्र मंडळ, महाजन नगर मेहरून यांच्या वतीने श्री चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री पी.ई. तात्या पाटील रुग्णालय, जळगाव यांच्या सहकार्याने शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात परिसरातील सुमारे ५०० नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. नागरिकांनी नेत्र तपासणीसह विविध होमिओपॅथी तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आणि मंडळाचे अध्यक्ष युवा उद्योजक श्री. अल्पेश भाऊ देवरे होते. शिबिरात होमिओपॅथी तज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, नेत्रतज्ञ डॉ. जयेश वाल्हे, फिजिओथेरपी तज्ञ डॉ. अभिलाषा मुंदडा, तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्राची खलसे, देवयानी चव्हाण, भावना दातीर, हर्षदा पाटील आणि श्रद्धा चौधरी यांनी सेवाभावी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुकेश भाऊ नाईक, नवल परदेसी, आकाश सोनवणे, तुषार नेमाडे, रोहित पाटील, ओम सागर देवरे, विवेक देशमुख, सिद्धेश पाटील, मनीष पांडे, विजय कासार, प्रसाद शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
