Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगाव शहरात पोलीस पाटील भवन उभारणी साठी प्रयत्नशील-आमदार मंगेश चव्हाण

0
2 0
Read Time2 Minute, 23 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगांव(प्रतिनिधी)-चाळीसगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या व चाळीसगाव येथे पोलीस पाटील भवन यासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी आमदार चव्हाण यांची अनेक विषयांवर चर्चा झाली. पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील कायदा – सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा दुवा असतो, कोविड प्रादुर्भावाच्या काळात पोलीस पाटील यांनी केलेले काम अतिशय महत्वाचे असे होते यात राज्यात अनेक पोलीस पाटील यांना आपला जीव गमवावा लागला. येत्या काही दिवसातच त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करायचे नियोजन आहे. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलीस पाटील यांचे मानधन ३००० वरून ६५०० रुपये वाढवून त्यांच्या इतर अनेक मागण्या देखील मान्य करण्यात आल्या होत्या असे आमदार चव्हाण यांनी सांगितले तसेच विधानसभा अधिवेशनात यासंबंधी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले आहेत मात्र गेल्या दीड वर्षात कोविडमुळे अधिवेशनाचे कामकाज देखील मोजकेच झाल्याने त्यावर चर्चा होऊ शकली नाही. मात्र पोलीस पाटील यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू राहील तसेच चाळीसगाव येथे पोलीस पाटील भवन उभारण्यासाठी महसूल व नगरपालिका यांच्यामार्फत सुयोग्य अशी जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांना आश्वासित केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: