अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
मणियार बिरादरी यांचा समाजहितासाठी कौतुकास्पद उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) –जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने समाजकल्याण आणि प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. समाजातील गरीब व गरजू महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने बिरादरीतर्फे १० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सक्षम होणार आहे.
उपअभियंता कार्यालयासमोर 10 मिनिटांच्या पावसात जलसंचय
याच कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांचा विशेष सत्कार करण्यात आला. चांगले गुण मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी यावेळी सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाला पुढे नेणे आणि त्यांना शिक्षण व स्वयंरोजगाराद्वारे स्वावलंबी करणे हे आमचे ध्येय आहे.”
या उपक्रमाला बिरादरीचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला व विद्यार्थ्यांचा सन्मान ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आला. मनियार बिरादरीने भविष्यातही समाजसेवा, शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रात असे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
