अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – दिनांक 31 ऑगस्ट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटर येथे गरजूंना फळे व पोषक आहार वाटप करून रुग्णांना मदत करण्यात आली.
या उपक्रमावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष रविंद्र जाधव, प्रदेश प्रतिनिधी रमेश शिंपी, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा सरचिटणीस प्रा. एम. एम. पाटील, आर. जी. पाटील, शहर सरचिटणीस अमजद खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम म्हणजे केवळ औपचारिकता नसून नेत्यांच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रम करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा छोटासा प्रयत्न करण्यात आला असल्याचे काँग्रेस चे शहराध्यक्ष रविंद्र जाधव यांनी सांगितले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी या उपक्रमातून समाजहिताचे कार्य करत हर्षवर्धन सपकाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
