अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) —तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी व सहकाऱ्यांना कर्तव्यनिष्ठ आणि उत्कृष्ट सेवेने महाराष्ट्र पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने त्यांना विशेष प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मेहुणबारे पो.स्टे. सी.सी.टी.एन.एस. गुरनं. 115/2025 भा.न्या.सं.क.331 (3), 331(4),305 या गुन्ह्यात 36 तासाच्या आत अज्ञात आरोपी निष्पन्न करुन आरोपीतांकडुन 3 लाख 20 हजार रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला होता याची दखल घेत सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ किशोर पाटील, पोहेकॉ गोकुळ सोनवणे, पोहेकॉ शांताराम पवार आणि पोकॉ विनोद बेलदार यांना पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आपल्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
या वेळी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले की, “आपले प्रशंसनीय कामाबद्दल अभिनंदन करीत आहोत. आपण केलेल्या सेवेचा महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो. आपण भावी काळातही असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावित राहाल व महाराष्ट्र पोलिस दलाच्या उज्ज्वल परंपरेत भर टाकाल, अशी आम्हाला खात्री आहे.”
पोलिस अधिकाऱ्यांच्या या सन्मानामुळे मेहुणबारे परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.
