अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
मोठी बातमी : ऑपरेशन “नार्कोस” मध्ये भुसावळ RPF-GRP ला मोठे यश
भुसावळ (प्रतिनिधी) :भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे संरक्षण दल (RPF) व रेल्वे पोलिस (GRP) यांच्या संयुक्त कारवाईत ऑपरेशन “नार्कोस” अंतर्गत तब्बल ४२.२८० किलो गांजा जप्त करण्यात आला असून ३ तस्करांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाची बाजारभावाने किंमत सुमारे ८ लाख ४५ हजार रुपये इतकी असल्याचे समजते.
कशी उघडकीस आली तस्करी
CIB/BSL ला गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ DSC भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची मोहीम राबविण्यात आली.
गांधीधाम एक्सप्रेस (क्र. १२९९४) या गाडीत भुसावळ स्थानकावर स्लीपर कोच S-5 मध्ये तीन संशयित तरुण प्रवास करत असल्याचे लक्षात आले. डॉग स्क्वॉड वीरूच्या मदतीने तपासणी दरम्यान त्यांच्या बॅगमध्ये लपवलेले २१ पाकिटे गांजा आढळले.
अटक आरोपींची माहिती
1. नलूमालु जसवंत डोरा (२५), रा. भोलाभांजा, जि. गंजम, उड़ीसा.
2. विप्र प्रकाश विद्याधर सेठी (१९), रा. गोपालपूर, ता. कोंडाला, जि. गंजम, उड़ीसा.
3. अलक सुभाषचंद्र बारीक (२५), रा. धनंजयपूर, ता. कोंडाला, जि. गंजम, उड़ीसा.
जप्ती व पुढील कारवाई
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये –
४२.२८० किलो गांजा (किंमत ₹८,४५,६००/-)
३ मोबाईल फोन (किंमत ₹३५,०००/-)
ही कारवाई एपीआय/जीआरपी किसन राख यांनी पंच व राजपत्रित अधिकारी ASC/RPF/BSL यांच्या उपस्थितीत केली. त्यानंतर GRP भुसावळ येथे गुन्हा क्र. ४२८/२०२५ भा.दं.वि. कलम ८, २०(ब) II(क), NDPS कायदा अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. पीआय/जीआरपी भुसावळ श्री. सुधीर दयारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
कारवाईत सामील अधिकारी व कर्मचारी
एएसआय शिवानंद गीते, हेड कॉन्स्टेबल महेंद्र कुशवाह, इमरान खान, अमोल पाटील, विशाल बोरोले, भूषण पाटील, मिलिंद झोपे आदींचा समावेश होता.
ऑपरेशन “नार्कोस” अंतर्गत सर्वात मोठी कारवाई
RPF व GRP च्या सतर्कतेमुळे ही कारवाई शक्य झाली असून आतापर्यंत ऑपरेशन “नार्कोस” अंतर्गत झालेली ही सर्वात मोठी गांजा जप्ती असल्याचे अधिकारी सांगतात.
