Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

रस्त्याच्या माध्यभागी अपघाताला निमंत्रण देणाच्या खोल चेंबर मध्ये वृक्षारोपण करून रयत सेनेचे आंदोलन…

0
0 0
Read Time2 Minute, 46 Second

संपादक गफ्फार मलिक

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

 

चाळीसगाव(प्रतिनिधी) – शहरातील पवारवाडी येथे नवीन होत असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले मुख्य चेंबर नवीन रस्त्याच्या एक ते दिड फुट खाली जात असल्यामुळे दुचाकी स्वार या खड्यांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे प्रभाग १० मधील पवारवाडी येथे रयत सेनेच्या वतीने दि १५ रोजी सकाळी १० वाजता चाळीसगाव नगरपरिषद प्रशासक व ठेकेदाराच्या निषेधार्थ रस्त्याच्या मध्यभागाच्या खड्यांमध्ये वृक्ष रोपण करण्यात आले.
चाळीसगाव शहरात चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने मलनिसारण योजनेच्या भुयारी गटारीच्या चेंबरचे बांधकाम जुन्या रस्त्याच्या लेवल प्रमाणे करण्यात आले आहे, त्यानंतर प्रभाग क्र १० मध्ये डाबरीकरणाच्या नवीन रस्त्यांचे कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी असलेले मुख्य चेंबर नवीन रस्त्याच्या एक ते दिड फुट खाली जात असल्यामुळे दुचाकी स्वार या खड्यांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे, यापूर्वी रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव नगरपरिषद येथे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या चेंबरची उंची वाढवण्यासाठी आंदोलन करण्यात येवून न पा अभियंता यांना यावेळी सदरची बाब निर्देशनास आणून दिल्यानंतर ही नगरपरिषद प्रशासक याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रभाग क्र १० मधील पवारवाडी येथे रयत सेनेच्या वतीने दि १५ रोजी सकाळी १० वाजता चाळीसगाव नगरपरिषद प्रशासक व ठेकेदाराच्या निषेधार्थ रस्त्याच्या मध्यभागाच्या खड्यांमध्ये वृक्ष रोपण करण्यात आले यावेळी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार व हरीश पवार, रवींद्र गायकवाड ,दिलीप पवार, मंगेश देठे ,निंबा पाटील, शंकर पवार सुनील पवार,अजय पवार उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: