Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

समुपदेशक जुलेखा शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी आयुष्याचा मंत्र

0
0 0
Read Time3 Minute, 18 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-समुपदेशक जुलेखा शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी आयुष्याचा मंत्र,इनरव्हील क्लब ऑफ मिल्क सिटी, चाळीसगावच्या माध्यमातून वाडीलालभाऊ राठोड उच्च माध्यमिक पिंपरखेड आश्रमशाळेतील सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी ‘मला मोठं मोठं व्हायचं’ या विषयावर चाळीसगाव येथील अंतरंग मानसिक समुपदेशन केंद्राच्या संचालिका आणि इनरव्हील क्लबच्या माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन जुलेखा विकास शुक्ल यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या प्रसंगी बोलतांना जुलेखा शुक्ल यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावी शैलीत विद्यार्थिनींशी संवाद साधला.
वाढ व विकास यातील फरक समजावून सांगितल्यावर त्यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक विकासासोबतच शारीरिक, मानसिक, नैतिक, सामाजिक, अध्यात्मिक आणि बौद्धिक विकास होणे किती आवश्यक आहे हे सांगितले. आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानाविषयी जाण असणे किती महत्वाचे आहे हेही विद्यार्थिनींना सांगितले. विद्यार्थिनींशी चर्चा करत त्यांनी पुरातन काळातील गुरुगृही घेत असलेलं शिक्षण ते आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचे शिक्षण असा उद्बोधक प्रवास विद्यार्थिनींना घडवला.
मनात संभ्रम आणि मानसिक तणाव अशा संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यातून आजकालची मुलं जात असतात. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचे दडपण, ते न मिळाल्यास येणारं नैराश्य, त्यातून होणाऱ्या आत्महत्या हे प्रकार आपण दरवर्षी बघत असतो. अशा वेळी अपयशाने खचून जाऊ नका, पालकांना आपले मित्र समजा, मनातील प्रत्येक गोष्ट आपल्या आईवडिलांशी बोला, त्यांच्यापासून काहीही लपवू नका असा सल्ला जुलेखाजींनी मुलींना दिला.

याप्रसंगी इंनरव्हील क्लब ऑफ मिल्कसिटी चाळीसगांवच्या अध्यक्षा सौ रेखा जोशी, आश्रमशाळेच्या चेअरमन सौ प्रतिभा राठोड व इतर सदस्यांची उपस्थिती होती. ह्या उपक्रमामुळे विद्यार्थिनी निश्चितच डोळसपणे आणि समंजसपणे आपल्या पुढील आयुष्यात पावले उचलतील असा विश्वास शाळेच्या शिक्षिकांनी व्यक्त केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: