रेमेडिसिव्हर चा काळा बाजार करणारे पुणे ग्रामीण एलसीबी पथकाच्या ताब्यात
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)- ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेमेडिसिव्हर इंजेक्शन ची जास्त दराने विक्री करून काळा बाजार होत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वात टीम तयार करण्यात आली होती या टीमने आज दौंड येथे दोन इसमास रेमेडिसिव्हर इंजेक्शनची जास्त दराने विक्री करत असताना रंगेहात पकडले १)अक्षय राजेश सोनवणे वय 24 वर्ष राहणार गांधी चौक विठ्ठल मंदिरा मागे दौंड व २)सुरज संजय साबळे वय 23 वर्ष राहणार शालिमार चौक स्वामी समर्थ मंदिरा मागे दोन्ही रेमेडिसिव्हर इंजेक्शन जास्त दराने विकत असल्याचे निदर्शनास आले यावेळी दोन्ही आरोपींकडून एक लाख 19 हजार 769 रुपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आला कोणत्याही प्रकारचा औषध परवाना नसताना स्वतःच्या फायद्यासाठी कोरोना रुग्णांसाठी वापरले जाणारे रेमेडिसिव्हर इंजेक्शन दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्यासाठी स्वतःजवळ बाळगून होते दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन
एक रेमेडिसिव्हर इंजेक्शन बत्तीस हजार रुपये प्रमाणे विकत असल्याचे निदर्शनास आले यावेळी दोनी आरोपींकडून 3 इंजेक्शन किंमत सात हजार 869 रुपये दोन मोबाईल किंमत वीस हजार रुपये व एक्टिवा गाडी किंमत 70 हजार रुपये असा एकूण 97 हजार 869 माल जप्त करण्यात आला
दोन्ही आरोपींवर दोन पोलिस स्टेशनला औषध नियंत्रण आदेश 2013 वाचन आदेश 3(2)सी, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 7(1)ए(2) औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 चे कलम 18(सी),27(बी)(2),28,22(1)(cca),22(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मिहिते मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,सह फौ शब्बीर पठाण,पो हवा महेश गायकवाड, निलेश कदम ,सचिन गायकवाड,सुभास राऊत,मुकेश कदम,दत्ता तांबे,सागर चंद्रशेखर,काशीनाथ रजापुरे,पो ना गुरू गायकवाड व पो कॉ दगडू विरकर यांनी केलेली आहे.